Join us  

‘ती’ पुन्हा चढली होर्डिंगवर, स्वत:ची दहशत पसरविण्यासाठीच असे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:46 AM

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली ४० वर्षीय महिला गुरुवारी दुपारी गिरगाव चौपाटी येथील एका होर्डिंगवर चढली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला खाली उतरविण्यात मरिन ड्राइव्ह पोलिसांना यश आले.

मुंबई : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली ४० वर्षीय महिला गुरुवारी दुपारी गिरगाव चौपाटी येथील एका होर्डिंगवर चढली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला खाली उतरविण्यात मरिन ड्राइव्ह पोलिसांना यश आले. यापूर्वी गेल्या वर्षीदेखील ती अशाच प्रकारे एका होर्डिंगवर चढली होती. सर्वत्र स्वत:ची दहशत पसरवण्यासाठीच ही महिला अशाप्रकारे वागत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.जुहू परिसरात सपना कुटुंबासह राहते. जुहू पोलीस ठाण्यात तिच्यावर ३० ते ४० गुन्हे दाखल आहेत. यात चोरी, मारामारीसारख्या गुन्ह्यांचा देखील समावेश आहे. गुरुवारी दुपारी २च्या सुमारास ती गिरगाव चौपाटी येथील एका होर्डिंगवर चढली. बघ्यांच्या गर्दीमुळे येथे काही काळ वाहतूककोंडीचीही समस्या उद्भवली होती. स्थानिकांनी तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कुणाचेही ऐकायला तयार नव्हती. घटनेची वर्दी लागताच मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला खाली उतरविण्यात यश आले. सध्या ती पोलीस कोठडीत आहे.गेल्या वर्षीही तिने असाच प्रकार केला होता. स्वत:ची दहशत पसरविण्यासाठीच ती टॉवर आणि होर्डिंगवर चढत असावी, असा संशय पोलिसांनी आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती गंगावणे यांनी दिली.

टॅग्स :गुन्हा