Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत

By admin | Updated: February 4, 2016 10:23 IST

वडाळा-शिवडी दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने सीएसटीच्या दिशेने येणारी हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - वडाळा-शिवडी दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने सीएसटीच्या दिशेने येणारी हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्यावेळी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांची ही कामावर जायची वेळ असल्याने वडाळा, शिवडी, चुनाभट्टी, कुर्ला आणि गुरू तेगबहाद्दूर नगर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. 
कुर्ला ते वडाळा दरम्यान अनेक लोकल जागेवर थांबून आहेत. रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु असले तरी, पुढचे काही तास प्रवाशांचे हाल होणार आहेत. हार्बरच्या प्रवाशांसमोर  आता मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सीएसटी प्रवासाचा पर्याय उपलब्ध आहे.