Join us

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल

By admin | Updated: August 22, 2014 09:00 IST

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्या ३० ते ४० मिनिटे उशीराने धावत आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्या ३० ते ४० मिनिटे उशीराने धावत आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसटीहून अंधेरी व पनवेलच्या दिशेने जाणा-या गाड्यांवर याचा परिणाम झाला असून सकाळच्या वेळेत झालेल्या या गोंधळामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. 
रेल्वेचे अधिकारी व करम्चारी बिघाड दुरूस्त करत असून थोड्याच वेळात वाहतूक पूर्ववत होईल असे समजते.