Join us  

Happy Sankranti : म्हणून यंदा 15 जानेवारीला साजरी होतेय 'मकर संक्रांत'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 9:08 AM

मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होत जातो, तर तिळाप्रमाणे हा दिवस मोठा होत जातो, अशी अख्यायिका सांगितली जाते.

मुंबई - मकर संक्रांत म्हटलं की 14 जानेवारी हा जणू समजच रुढ झाला आहे. मात्र, मकर संक्रांतीचा आणि 14 जानेवारीचा काहीही संबंध नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला आली आहे. यापूर्वीही अनेकदा मकर संक्रांत 15 जानेवारीला आली आहे. कारण, सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश केला की मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करतो. 

मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होत जातो, तर तिळाप्रमाणे हा दिवस मोठा होत जातो, अशी अख्यायिका सांगितली जाते. यंदा 14 तारखेच्या सूर्यास्तानंतर रवी हा मकर राशीत प्रवेश करत असल्याने संक्रातीचा सण हा 15 जानेवारीला होत आहे. सोमवारी रात्री 8 नंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने मंगळवारच्या सुर्योदयानंतर हा सण साजरा होत आहे. साधारण 3 ते 5 वर्षातून एकदा एक दिवस उशिरा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळेच, संक्रातीचा सण 15 तारखेला येते. म्हणूनच, आज सुर्योदयानंतर यंदा मकर संक्रात सणाला सुरुवात साजरा होत आहे. आजपासून पुढील तीन दिवस हा सण देशभर साजरा केला जातो. मात्र, दक्षिण भारतात या सणाला पोंगल असेही म्हणतात. पोंगल म्हणून मोठ्या उत्साहात दक्षिण भारतात हा सण साजरा करण्यात येतो. तर पश्चिम बंगालमध्ये पिष्टक संक्रांती, आसाममध्ये माघ बिहू आणि पंजाबमध्ये लोहरी म्हणून हा सण आंनदाने साजरा करण्यात येतो.

टॅग्स :मकर संक्रांतीमकर संक्रांती २०१८