Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॅण्ड्‌स ऑफ ॲक्शनतर्फे गोरेगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:06 IST

मुंबई : कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार हॅण्ड्‌स ऑफ ॲक्शन ...

मुंबई : कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार हॅण्ड्‌स ऑफ ॲक्शन या संस्थेने प्रबोधन गोरेगाव संचलित मीनाताई ठाकरे रक्तपेढी आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरात २४ तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन रक्तदान केले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उपस्थिती दर्शवून सहभागी रक्तदात्यांचा विशेष सन्मान केला. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष नीलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मीनाताई रक्तपेढीचे प्रकल्प प्रमुख रमेश इस्वलकर तसेच नितीन कदम, केवल सावंत, विनायक पिल्लई आणि इतर हॅण्ड्‌स ऑफ ॲक्शन या संस्थेच्या सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली.

फोटो ओळ :

रक्तदान शिबिराप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उपस्थिती दर्शवून सहभागी रक्तदात्यांचा विशेष सन्मान केला.