Join us
Daily Top 2Weekly Top 5

फँड्री फाउंडेशनचा आदिवासींना मदतीचा हात

By admin | Updated: June 22, 2015 02:20 IST

फँड्री फाउंडेशनने सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट होप’चा पहिला टप्पा नुकताच पूर्ण केला. यात विविध भागांतील आदिवासी पाड्यांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना

मुंबई : फँड्री फाउंडेशनने सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट होप’चा पहिला टप्पा नुकताच पूर्ण केला. यात विविध भागांतील आदिवासी पाड्यांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या माध्यमातून आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. फँड्री फाउंडेशनच्या मुंबई टीमने नुकतेच डहाणू येथील कोटबी गावातील बुजडपाडा व खिंडपाडा या गावांतील सुमारे ३१९ विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वाटप केले. शिवाय मुलांच्या इतर कलागुणांना वाव देण्यासाठी क्राफ्ट, चित्रकला, यांचे शिबिर घेण्यात आले. तसेच या आदिवासी पाड्यांतील मुलांसोबत विस्मृतीत गेलेले खेळ खेळण्यात आले. गावातील नागरिकांची एक सभादेखील घेण्यात आली. यामध्ये फाउंडेशनच्या सदस्यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.याप्रमाणे कुरुंगवाडी या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील दुर्गम अशा गावातील १९७ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे तसेच नागरिकांना चांगल्या स्थितीतील जुन्या कपड्यांचे वितरण केले. या गावातच सदस्यांनी तळ ठोकत गावकऱ्यांसह भजन, नाचगाणी इत्यादींचा आनंद लुटला. शिवाय येथील मुलांसाठी खास ओरिगामी शिबिरही घेण्यात आले. (प्रतिनिधी)