Join us  

हँकॉकमुळे १०० वर्ष जुन्या इमारतींमधील ३५० कुटुंबे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 2:50 PM

थॉवर पट्टा बचाव समितीची स्थापना

मुंबई : हँकॉक पुलासाठी शिवदास चपसी मार्गावर रस्ता रुंदीकरण होणार असून, यात निवासी इमारती बाधित होत आहेत. आता येथील ७ इमारतीचा सर्वे सुरु करतानाच त्यांना मुंबई महापालिकेने नोटीस बजवाली आहे. येथील जवळपास ३५० कुटुंब रस्ता रुंदीकरणासाठी बाधित झाली असून, या इमारती १०० वर्षे जुन्या आहेत.  

हँकॉक पुलाच्या रस्ता रुंदीकरणासाठी बाधीत झालेल्या इमारती अनुक्रमे मेघाजी इमारत, थॉवर मेशन ४, थॉवर मेशन ३, शेखभाई इमारत, थॉवर मेंन्स नंबर २, प्रगती इमारत, सकिना बाई मेंशन, श्यामजी इमारत या मधील जवळपास ३५० कुटुंब रस्ता रुंदीकरणासाठी बाधित झाली आहेत. या इमारती ब्रिटीश कालीन असून १९२० म्हणजे जवळ जवळ १०० वर्ष जुन्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्राचे राज्य सचिव समीर विजय शिरवडकर यांनी दिलेलया माहितीनुसार यातील काही इमारती म्हाडाच्या सेसमध्ये आहेत तर काही इमारती महानगरपालिकाच्या अंतर्गत आहेत. विभागातील जनतेचा विकास कामाला विरोध नाही. पंरतु इमारती ज्या विभागाच्या ताब्यात आहे  त्या विभागाने सर्वे बाधित लोकांना याच विभागात घर आणि मोबदला देण्यात यावा.

येथील हा प्रश्न सोडविण्यासाठी थॉवर पट्टा बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी पत्रव्यवहार आणि अधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहेत. प्रगती इमारटीमधील रंजन माळी यांनी यासाठी अनेक पत्रव्यवहार केले आहेत. यासाठी सर्वे इमारतीमधील प्रतिनिधी रंजन माळी, ललित मालवणकर, गिरीष बवले, विलास पाटील, रमेश पाटील, नरेश वेतकर, अमित मालवणकर, सुभाष घासे आदी काम करत आहेत.  दरम्यान, नव्याने इमारत बांधून याच विभागात पुनर्वसन करावे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईमध्य रेल्वे