Join us

भररस्त्यात वृध्देवर हातोडीने हल्ला

By admin | Updated: January 10, 2017 04:54 IST

कामाठीपुरा परिसरातून पायी एकट्या निघालेल्या ६२ वर्षीय माया आम्मा या वृद्धेवर

मुंबई : कामाठीपुरा परिसरातून पायी एकट्या निघालेल्या ६२ वर्षीय माया आम्मा या वृद्धेवर लुटारूंनी हातोडीने हल्ला चढविल्याची खळबळजनक घटना नागपाड्यात घडली आहे. त्यांच्या अंगावरील किमती ऐवजावर डल्ला मारुन लुटारू पसार झाला आहे. मध्यरात्री उशिराने हे प्रकरण उघकीस येताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.मदनपुरा परिसरात त्या गोल्ड वुमन म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्या एकट्याच असल्याने लुटारूने त्यांना टार्गेट केले. पाठीमागून आलेल्या लुटारूने भररस्त्यात त्यांच्या डोक्यात हातोडीने हल्ला चढविला. काही समजण्याच्या आतच पाठीवर दुसरा हल्ला चढविला. हीच संधी साधून त्याने त्यांच्या अंगावरील किमती सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. (प्रतिनिधी)