Join us

शक्ती मिलमध्ये आता हॅलोजन लागणार : हायकोर्ट

By admin | Updated: May 7, 2014 05:48 IST

बलात्कारांच्या घटनेने चर्चेत आलेल्या महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये हॅलोजन लावण्याचे काम आता येत्या काही दिवसांत सुरू होणार असून त्याची माहिती मंगळवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली़.

मुंबई : बलात्कारांच्या घटनेने चर्चेत आलेल्या महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये हॅलोजन लावण्याचे काम आता येत्या काही दिवसांत सुरू होणार असून त्याची माहिती मंगळवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली़. या मिलच्या मालकीवरून वाद सुरू आहे़ त्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना या मिलमधील मोडकळीस आलेला भाग पाडण्यासाठी महापालिकेने न्यायालयात अर्जही केला़. त्यावरील सुनावणीत या मिलमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराची दखल घेत न्यायालयाने या मिलची साफसफाई करण्याचे आदेश दिले़ याचे काम तीन टप्प्यात होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालयात स्पष्ट केले़. त्यानुसार पहिल्या टप्प्यात या मिलला कुंपण घालण्यात आले़ त्यानंतर तेथील कचरा व झुडपे काढून तेथे सुरक्षा रक्षक नेमण्यात आला़. ही कामे पूर्ण झाली असून आता या मिलमध्ये हॅलोजन लावण्याचे काम केले जाणार आहे़. यासाठी सुमारे २५ लाख रूपये खर्च अपेक्षित असल्याचे मंगळवारी न्यायालयाला सांगण्यात आले़ ते ग्राह्य धरत न्यायालयाने हे काम सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले़. (प्रतिनिधी)