मुंबई : परीक्षेला काही तास शिल्लक असतानाही विद्याथ्र्याना हॉल तिकीट मिळाले नसल्याचा प्रकार नुकताच विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये घडला. यामुळे विद्याथ्र्याची चांगलीच तारांबळ उडाल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत परीक्षेच्या 2क् दिवस अगोदर विद्याथ्र्याना हॉल तिकीट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने पुढील परीक्षांवेळी विद्याथ्र्याना हॉल तिकिटाची अखेरच्या दिवसार्पयत प्रतीक्षा करावी लागणार नाही.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याची विद्यापीठामार्फत परीक्षा घेण्यात येते. परीक्षेपूर्वी 2क् दिवस अगोदर विद्याथ्र्याना हॉल तिकीट मिळाले पाहिजे असा नियम आहे. मात्र विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांची संख्या अधिक असल्याने परीक्षा विभागावर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. विद्यापीठाने तंत्रज्ञानाची कास धरली असली तरी विद्याथ्र्याना परीक्षेच्या अखेरच्या दिवसार्पयत हॉल तिकीट मिळत नसल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या बीएमएसच्या विद्याथ्र्याना परीक्षेच्या आदल्या दिवसार्पयत हॉल तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे विद्याथ्र्याची चांगलीच तारांबळ उडाली होती. याची गंभीर दखल घेत युवा सेनेचे सिनेट सदस्य आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महादेव जगताप यांनी विद्याथ्र्याना वेळेत हॉल तिकीट देण्याची मागणी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत केली होती. विद्यापीठानेही ही मागणी मान्य करीत परीक्षेच्या 2क् दिवस अगोदर हॉल तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्याथ्र्याना हॉल तिकिटाची अखेरच्या क्षणार्पयत प्रतीक्षा करावी लागणार नाही. (प्रतिनिधी)
ऑनलाइन पद्धतीने विद्याथ्र्याना देण्यात येणा:या हॉल तिकीटमध्ये असंख्य चुका होत आहेत. याचा नाहक मनस्ताप विद्याथ्र्याना सहन करावा लागतो. अभ्यासाऐवजी हॉल तिकिटाची विद्यार्थी प्रतीक्षा करीत बसल्याने त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. विद्यापीठाने परीक्षेपूर्वी 20 दिवस अगोदर हॉल तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्याने विद्याथ्र्याना दिलासा मिळेल, असे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महादेव जगताप यांनी सांगितले.