मुंबई : मुंबईतील बहुतांशी भागांमध्ये मलवाहिनीच नसल्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयांची सुविधा पुरविणे अवघड जात आहे़ शौचालयांचा अभाव असल्याने झोपडपट्टी परिसरामध्ये एका शौचकुपाचा वापर ४० जण करीत असल्याची धक्कादायक कबुली पालिका प्रशासनाने केंद्रीय समितीपुढे दिली आहे़ मलवाहिन्या नसतानाही झोपडपट्टीधारकांकडून मलनिस्सारण कर मात्र वसूल करण्यात येत आहे़केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी पालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेतली़ त्या वेळी ही धक्कादायक कबुली प्रशासनाने दिली़ ब्रिटिशांनी १३० वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईत तयार केलेले मलवाहिन्यांचे जाळे उपनगराच्या विस्तारानंतर तोकडे पडू लागले़ त्यामुळे शहरातील ४९ टक्के भागांमध्ये मलवाहिन्याच नसल्याने झोपडपट्ट्यांमध्ये ही प्राथमिक सुविधा पुरविणे अवघड जात असल्याचे पालिकेने मान्य केले़झोपडपट्ट्यांमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात ४० लोक एक शौचकुपी वापरत असल्याचे आढळून आले होते़ झोपडपट्टी परिसरात मलवाहिनी टाकण्यासाठी जागाच शिल्लक नाही़ अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या असल्याने शौचालयांपर्यंत मलवाहिन्या पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे सेफ्टीक टँकचा पर्याय वापरला जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)च्झोपडपट्ट्यांमध्ये मलवाहिन्यांची सोय नाही़ तरीही पाणीपट्टी बिलाच्या ६० टक्के मलनिस्सारण कर झोपडपट्टीतील रहिवाशांकडून पालिका वसूल करीत आहे़ हा कर वसूल करणे तत्काळ बंद करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे़नाल्यांमध्ये वाहते मलजलअनेक ठिकाणी मलवाहिन्या नाहीत़ त्यामुळे शौचालयाच्या बेकायदा जोडण्या अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेले नालेही दूषित झाले आहेत़
निम्म्या मुंबईत मलवाहिन्याच नाहीत
By admin | Updated: June 6, 2015 00:55 IST