Join us

आधी गृहकर्ज मंजूर; नंतर मात्र नाकारले

By admin | Updated: September 19, 2014 02:51 IST

कर्ज नाकारणा:या बँक ऑफ बडोदाच्या जोगेश्वरी आणि अंधेरी शाखेला ठाणो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने 1 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

ठाणो : कागदपत्रंची पडताळणी करून आधी गृहकर्ज मान्य करणा:या आणि नंतर त्याच कागदपत्रंबाबत शंका उपस्थित करून कर्ज नाकारणा:या बँक ऑफ बडोदाच्या जोगेश्वरी आणि अंधेरी शाखेला ठाणो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने 1 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
नालासोपारा येथे श्रीदत्त सोसायटी येथे राहणारे जयप्रकाश कुशवाहा यांनी राहुल लोखंडे यांचे नालासोपारा येथील न्यू निल अंगण सोसायटीतील घर 4 लाखांना विकत घेण्याचे ठरविले. त्यानुसार 12 मार्च 2क्क्7 रोजी नोंदणीकृत करार केला. यावेळी कुशवाहा यांनी लोखंडे यांना 87 हजार दिले तर उर्वरित 3 लाख 13 हजार बँकेकडून कर्ज घेवून देण्याचे मान्य केले. गृहकर्जासाठी त्यांनी जोगेश्वरी पश्चिमेतील बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधला. 
छाननी झाल्यावर 12 एप्रिल 2क्क्7 ला त्यांनी कर्ज मंजुरीसाठी बँकेला पत्र दिले. कर्ज देण्याचे बँकेने मान्य केले. त्यासाठी त्यांनी साकीनाका शाखेत प्रोसेस फी आणि गहाण खर्च म्हणून 4 हजार 625 दिले. तर न्यू निल अंगण सोसायटीकडे घर नावावर करण्यासाठी अर्ज केला. लोखंडे यांनीही ना हरकत प्रमाणपत्र दिले. परंतु बँकेने कर्ज दिलेच नाही. 
 या प्रकरणात बँकेचा निष्काळजीपणा असून भरपाई द्यावी, असा आदेश मंचाने दिला.
 
कर्ज दिले..
बँकेने कागदपत्रंची तपासणी झाल्यावर 3 लाख 13 हजारांच्या कर्जाला मंजुरी देऊन करार नोंदणी करण्यास सांगितले. तर कजर्प्रक्रियेसाठी साकीनाका येथील शाखेत जाण्यास सांगितले.
 
कर्ज नाकारले..
परंतु नंतर फाईल गहाळ झाल्याचे सांगून ती मिळाल्यावर कर्ज देण्याचे आश्वासन दिले. कुलमुखत्यारपत्र नोंदणीकृत नसल्याने व्यवहार बेकायदा आहे. त्यामुळे गृहकर्ज मागण्याचा अधिकारच नसल्याचे बँकेने सांगितले.