4 सप्टेंबरला हज विधी
मुंबई : सौदी अरेबियामध्ये पुढील महिन्यामध्ये होत असलेल्या हज यात्रेसाठी मुंबईतून 45क् यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या (रविवारी) रवाना होत आहे. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी साडेअकरा वाजता विमानाचे उड्डाण होणार आहे. मुस्लीम धर्मीयांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणारा हजचा मुख्य विधी 4 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हज कमिटी ऑफ इंडियातर्फे 4 हजार 575 मुस्लीम बांधव या यात्रेला जाणार आहेत.
हजसाठी राज्यातून मुंबईसह औरंगाबाद व नागपूर येथूनही यात्रेकरूंना पाठविले जाणार आहे. त्यापैकी औरंगाबाद इम्बारकेशन पॉइंटवरून 7 सप्टेंबरपासून विमानाची उड्डाणो सुरू झाली आहेत. मुंबईतून 4 हजार 575 यात्री हज यात्रेसाठी सौदी अरेबियाकडे प्रस्थान करणार आहेत. त्यासाठीचे पहिले विमान रविवारी सकाळी साडेअकरा वाजता उड्डाण करण्याचे नियोजित असल्याचे राज्य हज समितीचे कक्ष अधिकारी एफ.एन. पठाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)