Join us

विनयभंग प्रकरणी हेअर ड्रेसरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 05:50 IST

दक्षिण मुंबईत एका पार्लरमध्ये तरुणीचे केस धूत असताना तिला चुकीचा स्पर्श करणे अल्ताफ सलमानी या हेअर ड्रेसरला महागात पडले.

मुंबई : दक्षिण मुंबईत एका पार्लरमध्ये तरुणीचे केस धूत असताना तिला चुकीचा स्पर्श करणे अल्ताफ सलमानी या हेअर ड्रेसरला महागात पडले. विनयभंगप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.व्ही. पी. रोड परिसरात राहणारी पीडित तरुणी सोमवारी केस कापण्यासोबत फेशिअल आणि हेअर स्ट्रेटनिंगसाठी अल्ताफच्या सलूनमध्ये गेली होती. त्याने फेशिअल केल्यानंतर तिचे केस धुतले. त्या वेळी त्याने तरुणीच्या केसांवर जास्त पाणी ओतले. त्यामुळे तिचे टी-शर्ट ओले झाले. सलमानी तिला दुसरे टी-शर्ट द्यायला तयार झाला होता. मात्र, तिने नकार दिला. केस आणि टी-शर्ट सुकविण्याच्या नावाखाली आरोपीने अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याने त्यांच्यात वाद झाला. मात्र, सलमानी उलट बोलू लागल्याने व्ही. पी. रोड पोलिसांत तक्रार नोंदविल्याचे तरुणीने सांगितले. त्यानंतर व्ही. पी. रोड पोलिसांनी सलमानीला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली.