Join us

माऊलीच्या जयघोषाने दुमदुमली डोंबिवली

By admin | Updated: September 15, 2014 23:05 IST

ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी शहरभर माऊलींची दिंडी काढण्यात आली.

डोंबिवली : ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी शहरभर माऊलींची दिंडी काढण्यात आली. या माध्यमातून ज्ञानेश्वरीसह महाराजांच्या तैलचित्रचे पूजन करण्याच्या आवाहनाला शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासून शहराच्या पश्चिमेकडील भागातून निघालेल्या या दिंडीने पूर्वेकडील विविध भागांमध्ये जाऊन माऊलींच्या नामाचा जयघोष केला़ नागरिकांनी सकाळच्या वेळेत भक्तिमय वातावरणात हरिनामाच्या जयघोषात आणि जल्लोषात या उपक्रमाचे स्वागत केले.
भाद्रपद वद्य षष्ठी, या मराठी महिन्याप्रमाणो महाराजांची जयंती साजरी केली जात असल्याचे प्रतिष्ठानचे अनिरुद्ध रनाळकर यांनी सांगितले. आळंदीप्रमाणोच या ठिकाणीही सर्व सोपस्कार करून ज्ञानेश्वरीचे दर्शन-पूजन-अर्चन आणि आरतीही करण्यात आली. त्यामध्ये पूर्वेकडील गोविंदानंद श्रीराम मंदिराच्या वतीनेही दिंडीची पूजा करण्यात आली. त्या वेळी मंडळाच्या अध्यक्षा माधुरी घाटे, कार्यवाह हेमंत (बाबल्या) गोलतकर, तेंडोलकर बुवा आदी मान्यवर उपस्थित होते. यासंदर्भात प्रतिष्ठानच्या वतीने याबाबतची माहिती श्री स्वामी समर्थ मंडळाचे कोषाध्यक्ष राजू भिडे यांना दिली होती. ठरल्याप्रमाणो सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास हा सोहळा पार पडला़ (वार्ताहर)
 
ढोल-ताशा ङोंडय़ांची रंगत
जसजशी ही दिंडी पश्चिमेकडील महात्मा फुले रोड, महात्मा गांधी रोडमार्गे रोड ओव्हर ब्रिजमार्गे पूर्वेकडे रामनगर, स्टेशन परिसर अशा भागांत आली, तसतशी यामध्ये सहभागी होणा:यांची गर्दी वाढत गेली. यात सहभागी झालेले ढोल-ताशांचे पथक दिंडी आल्याचा संदेश देत होते. अत्यंत आकर्षक पद्धतीने भगवा ङोंडा हवेमध्ये उंच-उंच फडकवून अनेकांना आकर्षित करून घेतले.
 
महिलांची दुचाकीस्वारी 
शहरातील व प्रतिष्ठानमधील भगिनींनी पारंपरिक वेशामध्ये दुचाकीवरून या दिंडीत सहभाग दर्शवला, त्यामुळे आधुनिक युगातील नारींसह पारंपरिक पोशाख असा उत्कृष्ट संगम डोंबिवलीकरांनी अनुभवला.