Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचा जिम्नॅस्ट निशांत करंदीक़र भारतीय संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST

मुंबई : येत्या २६ ऑक्टोबरपासून ढाका येथे सुरू होणाऱ्या सेंट्रल साउथ आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मुंबईतील विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे ...

मुंबई : येत्या २६ ऑक्टोबरपासून ढाका येथे सुरू होणाऱ्या सेंट्रल साउथ आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मुंबईतील विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील निशांत करंदीकर याची पहिल्या क्रमांकावर निवड झाली आहे. ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे. निशांत हा मुलांच्या गटातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील पहिला खेळाडू असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. निशांतच्या निवडीमुळे संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू व कार्यवाह मोहन राणे तसेच मुख्याधिकारी प्रीतम क़ेसकर यांच्यासहित संपूर्ण संकुलात उत्साहाचे वातावरण आहे.

गेली आठ ते १० वर्षे निशांतने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात प्रशिक्षक विशाल कटकदौड व नीलम बाबरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिक्सचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. आता तो पुढील स्पर्धात्मक प्रशिक्षणासाठी नुकत्याच प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात रुजू झालेले जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक शुभमगिरी यांच्या मार्गदर्शनाख़ाली जिम्नॅस्टिक्स या खेळाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेत आहे. वडील डॉ. रमेश प्रभू व आई डॉ. पुष्पा प्रभू यांचे मिशन ऑलिम्पिकचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, अशी आशा अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी व्यक्त केली.

खेळाडूंना पुढे जाण्यासाठी योग्य ती मदत करण्यास समिती नेहमीच अग्रेसर राहिली आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक्स संघटनेचे प्रमुख कार्यवाह मकरंद जोशी यांनीही राज्य संघटनेमार्फ़त क्रीडा संकुलाचे आभार मानले. यापूर्वी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या मुलींच्या गटातून वंदिता रावल, द्विजा आशर, श्रावणी वैद्य, उर्वी अभ्यंकर, अनुष्का पवार अशा अनेक खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.