Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालवणीत साडेचार लाखांचा गुटखा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:12 IST

मालवणी पोलिसांची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालवणीत साडेचार लाखांचा गुटखा गुरुवारी हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी एकाला ...

मालवणी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालवणीत साडेचार लाखांचा गुटखा गुरुवारी हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशी सुरू आहे.

मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राठोडी गावात अवैध गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती परिमंडळ ११ च्या विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांना मिळाली. त्यांनी याबाबत पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांना सांगितले. त्यानुसार डॉ. हिंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई निजाई, भालेराव, नाडगौडा आणि बाबर या पथकाने राठोडी गावात छापा मारून सुमारे ४ लाख ५५ हजार रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा हस्तगत केला. तसेच त्याची विक्री करणाऱ्या राजेश महेंद्र प्रताप या इसमाला ताब्यात घेत नंतर अटक करण्यात आली. हा गुटखा त्याने कुठून आणला याची चौकशी आणि पुढील तपास मालवणी पोलीस ठाणे करीत आहे.