Join us

गुरुगोविंद सिंग जयंतीनिमित्त गुरुद्वारा सज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिखांचे दहावे गुरू गुरूगोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील सर्व गुरुद्वारा सज्ज झाले आहेत. गुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिखांचे दहावे गुरू गुरूगोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील सर्व गुरुद्वारा सज्ज झाले आहेत. गुरु गोविंद सिंग यांच्या बुधवारी असलेल्या जयंतीनिमित्त मुंबईतील सर्व शीख बांधवांनी जय्यत तयारी केली आहे.

मुंबईतील सर्व गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोणत्याही कार्यक्रमात शीख बांधवांतर्फे भक्तांसाठी लंगर प्रसादाचे वाटप करण्यात येते. बुधवारी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लंगर प्रसादासाठी मंगळवारीच सर्व गुरुद्वारांमध्ये जेवणाच्या वस्तूंची साठवणूक करण्यात आली होती. यासाठी गुरुद्वारांना विविध ठिकाणाहून दान मिळाले होते. गुरुद्वारांमध्ये बुधवारी सर्वप्रथम निशाण साहेबजींची स्थापना करण्यात येणार आहे. यानंतर अखंड पाठ साहिब, भजन - कीर्तन संगीत, मिरवणूक या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे; मात्र यंदा कोरोनाचे संकट पाहता कमी लोकांच्या उपस्थितीत मिरवणुका निघणार आहेत. अनेक गुरुद्वारांतर्फे गर्दी जमेल अशा कार्यक्रमांचे आयोजन रद्द करण्यात आले आहे.