Join us

मुंबईत गुमास्ता कामगारांनी काढली दिंडी

By admin | Updated: July 4, 2017 14:33 IST

मुंबईतील सर्वात मोठा कपडा बाजार म्हणून ओळख असलेल्या मंगलदास मार्केटमधील गुमास्ता कामगारांनी आज आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4 - मुंबईतील सर्वात मोठा कपडा बाजार म्हणून ओळख असलेल्या मंगलदास मार्केटमधील गुमास्ता कामगारांनी आज आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली. गुमास्ता कामगार युनियनने या दिंडीचे आयोजन केले आहे.
याठिकाणी कपडा विक्रीचे पाच बाजार असून त्यात मोठ्या संख्येने मराठी कामगार कार्यरत आहेत. सातारा, सोलापूर, कराड, कोल्हापूर, पुणे, कोकण या जिल्ह्यांतील कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी एकादशीचे निमित्त साधत परिसरात कामगारांची दिंडी निघते. नजीकच्या विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरात दिंडीचा समारोप केला जातो.