Join us

गुजराती मतदार भाजपावर नाराज

By admin | Updated: October 5, 2014 00:45 IST

गेल्या आठ निवडणुकांत भाजपाची पाठराखण करणा:या बोरीवलीतील गुजराती भाषिकांची कोंडी झाली आहे.

मुंबई : गेल्या आठ निवडणुकांत भाजपाची पाठराखण करणा:या बोरीवलीतील गुजराती भाषिकांची कोंडी झाली आहे. प्रदेशातील बडय़ा नेत्याचा सुरक्षित मतदारसंघासाठीचा हट्ट पूर्ण करण्याच्या नादात स्थानिक गुजराती नेत्यांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील गुजराती मतदार भाजपावर नाराज आहेत. आपली नाराजी व्यक्त करण्याचीही भीती असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याचा बाका प्रसंग या नेत्यांवर आला आहे. 
बोरीवली मतदारसंघातील गुजराती समाजाच्या जोरावर भाजपाने या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली. मात्र, 2क्क्4 साली विद्यमान आमदार असणा:या हेमेंद्र मेहतांना बाजूला सारून दक्षिण भारतीय असणा:या  गोपाळ शेट्टींना उमेदवारी देण्यात आली. दोन वेळा 2क्क्4 आणि 2क्क्9 साली त्यांना पाठिंबाही दिला. गोपाळ शेट्टी लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्याने पुन्हा एकदा गुजराती समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा गुजराती भाषिकांना होती. 
मात्र, विलेपार्लेत राहणा:या विनोद तावडेंना बोरीवलीत उमेदवारी दिली. भाजपासाठी सुरक्षित असणा:या मतदारसंघात इतक्या मोठय़ा नेत्याने येण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, सुरक्षित मतदारसंघाच्या हट्टापायी बोरीवलीत राहणा:या स्थानिक गुजराती उमेदवारांना अन्य मतदारसंघात जावे लागले. त्यामुळे गुजराती समाजाला गृहीत धरण्यात येत असल्याची टीका होत आहे. (प्रतिनिधी)
 
च्विलेपार्लेची जागा शिवसेना सोडायला तयार नसल्याचा बहाणा करत विनोद तावडेंनी बोरीवलीवर हक्क सांगितला. 
च्पण युती तुटल्याने शिवसेनेच्या आडकाठीचा प्रश्न नव्हता. तरीही केवळ सुरक्षित मतदारसंघ म्हणून बोरीवलीसाठी हट्ट धरण्यात आला.
 
गुजराती भाषिकांचे प्राबल्य असणा:या बोरीवलीत आमदारकीची हॅट्ट्रिक करणा:या हेमेंद्र मेहतांना हटवून गोपाळ शेट्टींना संधी देण्यात आली. शेट्टी आता खासदार झाल्याने पुन्हा एकदा आमदारकीच्या रूपाने गुजराती समाजाला संधी देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, तावडेंच्या हट्टापायी ही संधी नाकारण्यात आल्याने नाराजीची भावना आहे.