ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २६ - मुंबईतील सुप्रसिध्द असलेल्या जीएसबी गणपती मंडळाने २६० कोटी रूपयांचा विमा उतरवल्याची माहिती आहे.
लालबागच्या राजाच्या विम्यापेक्षा हा आकडा चौपट असून आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा विमा असल्याचे सांगण्यात येते आहे. येत्या शुक्रवारी, २९ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. मुंबईतील जीएसबी मंडळाने पाच दिवसांसाठी २६० कोटी रूपयांचा विमा उतरविला आहे. यामध्ये मंडप, गणपती बाप्पाची मूर्ती, तसेच दर्शनाला येणा-या भक्तांचा समावेश आहे. एका सरकारी विमा कंपनीकडून हा विमा उतरविल्याची माहिती असून हा आजपर्यंतचा सर्वात मोठा विमा ठरला आहे. जीएसबी मंडळाच्या गणपती मूर्तीवर २२ कोटींचे दागिणे चढवण्यात आले आहेत.