Join us
Daily Top 2Weekly Top 5

गिधाडांच्या संख्येत होतेय वाढ

By admin | Updated: June 4, 2015 22:27 IST

हिमालयीन ग्रिफॉन (करडे गिधाड),पांढरे गिधाड (इजिप्तिशियन गिधाड), काळे गिधाड (सिनेरियस गिधाड), लांब चोचीचे गिधाड या जाती दिसून येतात.

जयंत धुळप - अलिबागनैसर्गिक अन्न साखळीत महत्त्वाचा घटक असणाऱ्या गिधाडांच्या संख्येत गेल्या दोन-चार वर्षांत वाढ झाली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ही महत्त्वाची व सकारात्मक घटना असल्याचे ज्येष्ठ पक्षी निरीक्षक, अभ्यासक व पक्षिमित्र छायाचित्रकार डॉ. वैभव देशमुख यांनी सांगितले.भारतात, पांढरपाठी गिधाड, राज गिधाड (लाल डोक्याचे गिधाड), युरेशियन ग्रिफॉन गिधाड (करडे गिधाड), हिमालयीन ग्रिफॉन (करडे गिधाड),पांढरे गिधाड (इजिप्तिशियन गिधाड), काळे गिधाड (सिनेरियस गिधाड), लांब चोचीचे गिधाड या जाती दिसून येतात.विभिन्न जातींची गिधाडेही एकत्र विहार करीत असून प्रत्येक गिधाडाची नजर इतर गिधाडांवर असते. या गिधाडांमधील ‘इजिप्शियन गिधाड’ जातीचे डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटर अंतरावरील शिकार किंवा खाद्य हे सहज हेरू शकतात. बहुतेक गिधाडांची याच राज गिधाडावर नजर असते.भारतात गेल्या २० ते २५ वर्षांत गिधाडांची संख्या झपाट्याने कमी झाली. गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय अशी भीती पक्षी निरीक्षकांना व पक्षीप्रेमींना वाटू आहे. गिधाडांची कोणी शिकार करत नाही, तरी त्याची संख्या कमी होत होती. औषधे व रसायनांमुळे गिधाडांच्या संख्येत घट होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. गाई-म्हशी अशा पाळीव प्राण्यांना डायक्लोफिनॅक नावाचे औषध देण्यात येते. अशा पशूंचे मांस खाल्ल्याने गिधाडांच्या संख्येवर परिणाम होत असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने डायक्लोफिनॅक या औषधांवर बंदी आणली आहे. परंतु अद्यापही त्याची पूर्णत: अंमलबजावणी होताना दिसत नाही. मुरु ड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात वनविभागाकडून सध्या गिधाड संवर्धन प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाला ‘वल्चर रेस्टॉरंट’ असे नाव देण्यात आले आहे. अभयारण्य परिसरातील गिधाडांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सुरु वातीला या परिसरात १५ ते २० गिधाडे आढळून येत होती. आज ही संख्या ७०च्या वर गेली आहे. सध्या प्रजननक्षम गिधाडांची १० जोडपी येथे असल्याची माहिती डॉ.देशमुख यांनी दिली.४बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्टन आॅफ द बर्ड्स यांच्या संशोधन आणि मार्गदर्शनातून, हरियाणा सरकारने पिंजोर येथे ,पश्चिम बंगाल सरकारने बुक्सा येथे तर आसाम सरकारने रानी येथे गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे सुरु केले आणि संपूर्ण विश्वात केवळ एक टक्का शिल्लक राहिलेल्या गिधाडांच्या पिल्लांचे संगोपन करण्यास सुरु वात केली. ४रायगड जिल्ह्यातील महाड येथील पक्षी निरीक्षक, अभ्यासक व पक्षिमित्र सागर मेस्त्री यांनी गिधाडांची संख्या झपाट्याने घटत असल्याचे लक्षात घेऊन महाडच्या सह्याद्री मंडळ आणि सिस्केप या संस्थांनी म्हसळा आणि श्रीवर्धनमध्ये गिधाड संवर्धनाची मोहीम हाती घेतली. त्याला मोठे यश आले आहे. ४पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची संख्या ११ वरून ७२ वर गेली आहे. म्हसळा आणि श्रीवर्धन परिसरात १९९७ ते २००० मध्ये केलेल्या सर्वेक्षणात पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची संख्या घसरून सातवर आली होती. वृक्षतोड, घरटी बांधण्यासाठी आवश्यक झाडांची कमतरता आणि अन्नाची कमतरता यामुळे ही संख्या घटली आहे.४‘सिस्केप’ आणि सह्याद्री मंडळाने म्हसळ्यातील चिरगाव आणि भापट या गावात ग्रामस्थांच्या मदतीने गिधाड संशोधन आणि संवर्धन केंद्र केले. सागर मिस्त्री यांनी पुढाकार घेतला तर वन विभाग आणि गाव कमिट्यांची मदत यातून गिधाडांचा अधिवास संरक्षित करण्यात आला. ४म्हसळा श्रीवर्धन परिसरात पूर्वी ११ असणारी गिधाडांची संख्या ७२ आता तर त्यात मोठी वाढ झाली आहे. सुरु वातीलामुरुड परिसरातील फणसाड अभयारण्यात १५ ते २० गिधाडे आढळून येत होती. मात्र जनजागृतीमुळे आज ही संख्या ७० च्या वर गेली आहे.