अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक २ जून रोजी होणार असून या निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये गटबाजी निर्माण झाली आहे. ९ पैकी पाच नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भात कोकण आयुक्तांकडे अर्ज केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. पाच विषय समितीच्या सभापती पदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सदस्य देतांना राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांना कोणत्याही महत्वाच्या समितीवर सदस्य घेण्यात आले नाही. त्यात नगरसेवक अशोक गुंजाळ, दिलीप पवार, नासिर कुंजाली, सुनिता पाटील आणि लतिका कोतेकर यांचा समावेश आहे. हा निर्णय पक्षात गटबाजीला कारणीभूत ठरत आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये गटबाजी
By admin | Updated: June 2, 2014 04:34 IST