Join us

गट, गणासाठी ५१८ अर्ज

By admin | Updated: January 13, 2015 22:32 IST

जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी जिल्हाभरातून २४५ उमेदवारी अर्ज आले असून पाच पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी २७३ उमेदवारी अर्ज मंगळवारी शेवटच्या दिवशी प्राप्त झाले आहेत.

ठाणे : जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी जिल्हाभरातून २४५ उमेदवारी अर्ज आले असून पाच पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी २७३ उमेदवारी अर्ज मंगळवारी शेवटच्या दिवशी प्राप्त झाले आहेत. यापैकी कल्याण तालुक्यातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसून अंबरनाथ तालुक्यातील चिंचपाडा व आडवली -ढोकळी या दोन गणांमध्येही उमेदवारी अर्ज आले नाहीत.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस होता. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेसाठी २४५ तर पाच पंचायत समित्यांसाठी २७३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. १४ जानेवारी रोजी या अर्जांची छाननी करून वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर १९ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.