Join us

महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:06 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, समन्वय समितीचे नागसेन कांबळे यांनीही पुष्प अर्पण करून महामानवाला अभिवादन केले, तर दुसऱ्या छायाचित्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चैत्यभूमी येथे जाऊन महामानवाला अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवरील भीमज्योतीस पुष्प अर्पण केले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व इतर मान्यवरांनीही महामानवास पुष्प अर्पण केले. (छाया : दत्ता खेडेकर)

.....................