Join us

शिक्षकांच्या पदभरतीला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:04 IST

पवित्र पोर्टल : ६००० शिक्षण सेवकांची होणार भरतीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने पदभरती ...

पवित्र पोर्टल : ६००० शिक्षण सेवकांची होणार भरती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने पदभरती प्रक्रियेवर बंदी घातली आहे. मात्र ३ डिसेंबरला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार शिक्षण विभागाची पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेली शिक्षणसेवक पदभरती प्रक्रिया त्यातून विशेष बाब म्हणून वगळली. त्यामुळे लवकरच ६००० शिक्षण सेवकांची पदभरती प्रक्रिया राबविली जाईल.

राज्यातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पहिली ते बारावीच्या वर्गातील शिक्षकांची १२,४०० पदे भरण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी पवित्र पोर्टल प्रणालीची निर्मिती केली. याच प्रणालीद्वारे आता स्थगिती मिळालेली शिक्षण सेवक भरती पुन्हा सुरू होईल.

राज्यात १० ते २० पटसंख्या असलेल्या जवळपास साडेसतरा हजार शाळा असून, त्यामुळे नव्याने दहा हजारांहून अधिक शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचे समायोजन कसे करायचे, हा प्रश्न शिक्षण विभागापुढे आहे. या पार्श्वभूमीवर तसेच राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता सध्या ६००० शिक्षण सेवकांची पदभरती जाहीर करण्यात आली आहे.

.........................