Join us

मुंबईत रंगणार ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धा

By admin | Updated: February 22, 2017 03:50 IST

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने

मुंबई : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, २१व्या राज्य स्तरीय ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २६ फेब्रुवारीला वडाळा भारतीय क्रीडा मंदिरात कुस्तीचा फड रंगणार आहे.मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ व राष्ट्रीय मिल मजदूर संघ यांच्या सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार मॅटवर लढती होतील. कुस्तीपटूंची वजने २४ फेब्रुवारीला घेण्यात येतील. २५ व २६ फेब्रुवारीला कुस्ती लढती होतील. स्पर्धेत ५९ किलो, ६६ किलो, ७१ किलो, ७५ किलो, ८० किलो, ८५ किलो, ९८ किलो व १३० किलो अशा आठवजनी गटात रोमांचक लढती रंगतील. (क्रीडा प्रतिनिधी)