मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहर आणि उपनगरांतील विविध ठिकाणांहून दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होणा-या जनतेसाठी बेस्टच्या वतीने जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत.५ डिसेंबर रोजी सायंकाळपासून बसमार्ग क्रमांक ५३, २४१, ३५१, ३५४, ९२ मर्यादित या बसमार्गावर रात्री उशिरापर्यंत ८ जादा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. शिवाय ६ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजल्यापासून बसमार्ग क्रमांक २७, ५३, ६३, ९३ मर्यादित, २४१, ३०५, ३५४, ३५७, ३८५, ४६३, ५०४ मर्यादित, ५२१ मर्यादित या बसमार्गावर एकूण ३० जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.प्रवाशांच्या मदतीसाठी वाहतूक अधिकाऱ्यांची, शिवाय बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार ज्यादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल. आणि शिवाजी पार्क येथून दैनंदिन बसपासची विक्री करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)
महापरिनिर्वाण दिनासाठी जादा बेस्ट गाड्या
By admin | Updated: December 2, 2014 00:55 IST