Join us  

पदवी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीचा आलेखही चढाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 5:43 AM

विद्यार्थ्यांना १२ ते १७ ऑगस्ट दरम्यान प्रवेशाची निश्चिती करायची आहे. तर तिसरी गुणवत्ता यादी १७ जून रोजी जाहीर होणार आहे.

मुंबई: पदवी प्रवेशाच्या मंगळवारी जाहीर झालेल्या दुसºया यादीनंतर अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये वाणिज्य व कला शाखेचा महाविद्यालयांतील कट-आॅफ केवळ दोन ते चार टक्क्यांनी खाली आला तर, विज्ञान शाखेचा कट-आॅफ हा सर्वांत खाली असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना १२ ते १७ ऑगस्ट दरम्यान प्रवेशाची निश्चिती करायची आहे. तर तिसरी गुणवत्ता यादी १७ जून रोजी जाहीर होणार आहे.पदवी प्रवेशाला देण्यात आलेल्या मुदतवाढीचा परिणाम दुसºया गुणवत्ता यादीवर दिसून आला. मंगळवारी जाहीर झालेली गुणवत्ता यादी ही पहिल्या यादीप्रमाणेच नव्वदीपार राहिली आहे. ७० ते ८० टक्क्यांतील विद्यार्थ्यांसाठी आवडत्या महाविद्यालयांतील प्रवेश यंदाही कठीणच झाल्यामुळे त्यांना आता तिसºया यादीची वाट पाहावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत जेथे प्रवेश मिळाला आहे तेथे त्यांनी निश्चिती करून घ्यावा, असे आवाहन प्राचार्यांकडून केले जात आहे. विशेषत: महाविद्यालयांमध्ये कला शाखेच्या जागा पूर्ण भरल्या असून प्रवेश बंद करण्यात आल्याचे कळते. मोजक्याच जागांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सेल्फ फायनान्स नव्वदीपारचकला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक शाखांबरोबरच यंदा सेल्फ फायनान्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्याचे पडसाद पदवी प्रवेशाच्या पहिल्याप्रमाणेच दुसºया गुणवत्ता यादीवरही दिसून आले. कला आणि वाणिज्य शाखांच्या कटआॅफमध्ये केवळ २ ते ३ टक्क्यांची घसरण दिसून आली. नामांकित महाविद्यालयांमध्ये हा आकडा अजूनही नव्वदीपारच आहे.