Join us

ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला ‘हदयनाथ जीवन गौरव’

By admin | Updated: April 12, 2016 05:39 IST

हदयेश आर्टस या संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा हदयनाथ जीवन गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला दिला जाणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - हदयेश आर्टस या संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा हदयनाथ जीवन गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला दिला जाणार आहे. 
राज्यपालचे विद्यासागर राव यांच्या हस्ते विश्वनाथन आनंदला आज मंगळवार दिनांक १२ एप्रिल २०१६ रोजी सांयकाळी ७ वाजता दिनानाथ मंगेशकर नाटयगृह, विलेपार्ले (प), मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
कार्यक्रमाला शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पं हदयनाथ मंगेशकर, रघुनंदन गोखले, आमिर खान, हदयेश आर्टसचे अध्यक्ष  अविनाश प्रभावळकर व इतर निमंत्रित उपस्थित राहतील. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन व ए आर रेहमान यांना यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.