Join us

तुर्भे गावात महिलांचा भव्य मेळावा

By admin | Updated: February 3, 2015 00:36 IST

विठाई प्रबोधन संस्था आणि भाजपा नगरसेविका विजया रामचंद्र घरत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी तुर्भे गाव येथे महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई : विठाई प्रबोधन संस्था आणि भाजपा नगरसेविका विजया रामचंद्र घरत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी तुर्भे गाव येथे महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राज्याचे सांस्कृतिक कार्य व शिक्षणमंत्री विनोद तावडे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी महिलांना विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला तुर्भे परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढत्या आधुनिकतेमुळे समाजात वाईट गोष्टीचा झपाट्याने प्रसार होताना दिसत आहे. आपल्या मुलांना या वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या मातांची आहे, असे प्रतिपादन तावडे यांनी यावेळी केले. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची मेळाव्यातील उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. प्रत्येक सासूने सुनेत आपली मुलगी आणी सुनेने सासूत आपली आई शोधली तर संसारातील भांडणे आणि समस्या कमी होतील, असा सल्ला तेजश्री प्रधान हिने यावेळी उपस्थित महिलांना दिला. तर महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्थानिक नगरसेविका विजया घरत यांनी यावेळी स्पष्ट केले.बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे संचालक सुरेश हावरे, कॉमेडी एक्स्प्रेसमधील विनोदी कलाकार अरुण कदम, भाजपाच्या राज्य कार्यकारिणी सचिव प्रा. वर्षा भोसले, भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सी.व्ही.रेड्डी, मनपा शिक्षण मंडळ सदस्य रामचंद्र घरत, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष संकेत पाटील, शत्रुघ्न पाटील, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)