Join us  

पूरग्रस्त ग्रामपंचायतींची 'स्वच्छता' होणार, सरकारकडून गावांना विशेष मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 3:40 PM

ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने

ठळक मुद्देसदर बैठकीत राज्यातील 353 ग्रामपंचायतीमध्ये अस्वच्छतेची परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले. 

मुंबई - राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या स्वच्छतेसाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्त गावातील ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर व पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत राज्यातील 353 ग्रामपंचायतीमध्ये अस्वच्छतेची परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले. 

ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा अशा एकूण पूरग्रस्त जिल्ह्यांतील 353 ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच ठिकाणी घनकचरा, मलबा, ओला कचरा व सांडपाणी जमा झाल्याने गाव व गावपरिसरात अस्वच्छतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सदर गावांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य तसेच स्वच्छतेचे महत्व लक्षात घेवून विखुरलेला कचरा गोळा करुन कचऱ्याचे वर्गीकरण तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने करावयाच्या बाबींसाठी उपरोक्त 353 ग्रामपंचायतींमधील सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना रक्कम रुपये 50,000 हजार आणि 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना रक्कम 1,0000 लाख विशेष बाब म्हणून वितरित करण्यात येणार आहे. सदर निधी उपरोक्तनुसार संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था यांच्या अधिनस्त सर्वसाधारण घटकांसाठी शिल्लक जागतिक बँक अर्थ सहाय्यीत कामगिरी आधारित प्रोत्साहन अनुदानातून वितरित करण्यास मान्यता या बैठकीमध्ये देण्यात आली.  

टॅग्स :पूरसदाभाउ खोत जल प्रदूषण