Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ग्रेस फाऊंडेशनचा आज प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंचम निषादचे संस्थापक शशी व्यास यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पंचम निषादचे संस्थापक शशी व्यास यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन (ग्रेस) फाउंडेशनच्या स्थापनेचे औचित्य साधून आज, रविवारी ‘घराना जेन-नेक्स्ट कॉन्सर्ट’ हा एकदिवसीय सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शास्त्रीय संगीत वादक, नृत्य कलाकार, लोक आणि सुगम संगीत कलाकार, आदी भारतीय सादरीकरण कला क्षेत्राशी संबंधित निरनिराळ्या प्रकारच्या प्रतिभावंतांच्या अस्सल क्षमतांना वाव देण्याच्या हेतूने या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.

रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात स. ८.३० ते सायंकाळी ८.३० या काळात होणाऱ्या कार्यक्रमात अंकिता जोशी (मेवाती घराणे), कौस्तुव कांती गांगुली (पतियाला घराणे), कोमल आणि चिन्मयी (ग्वाल्हेर घराणे), प्रिया पुरुषोत्तम (आग्रा घराणे), सिद्धार्थ बेलामन्नू (किराणा घराणे), कृष्णा बोंगाणे (रामपूर साहस्वन घराणे) आणि कश्यप बंधू (बनारस घराणे) हे कलाकर सहभागी होणार आहेत. त्यांना यशवंत वैशव, सिद्धेश बिचोलकर, प्रसाद पाध्ये, निरंजेन लेले, प्रणव गुरव, सुधांशू घारपुरे, स्वप्निल भिसे, अभिनय रवांदे, रामकृष्ण करंबळेकर, यती भागवत हे सहकलाकार साथ करतील.