मुंबई : केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील दोन गोदामांमध्ये धाडी घालून सुमारे २५ किलो एमडी ड्रग्ज हस्तगत केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या साठ्याची किंमत २५ कोटी असल्याची माहिती एनसीबीने दिली.या गोदामांमध्ये एमडीचा साठा दडवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. राज्यातल्या एमआयडीसींमधील औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये ओषधांआड एमडीची निर्मिती होत असल्याचा संशय एनसीबीला आहे. तेथूनच हा साठा मुंबईत आणून या गोदामांमध्ये दडवून ठेवल्याचीही शक्यता एनसीबी अधिकारी व्यक्त करतात. त्यानुसार अटक आरोपींकडून चौकशी सुरू असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. दरम्यान, एनसीबीच्या एका पथकाने महाड एमआयडीसीतल्या रोहन फार्मास्युटीकल्स कंपनीत धाड घातली होती. (प्रतिनिधी)
अंधेरीतून २५ किलो एमडी हस्तगत
By admin | Updated: March 5, 2015 00:53 IST