Join us
Daily Top 2Weekly Top 5

जीपीओत शुकशुकाट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 04:19 IST

सीएसआय प्रणाली लागू करण्यासाठी दक्षिण मुंबईतील १७ पोस्ट कार्यालये शनिवारपासून ३ दिवस बंद होती, तर जीपीओ रविवार व सोमवारी बंद होते.

मुंबई : सीएसआय प्रणाली लागू करण्यासाठी दक्षिण मुंबईतील १७ पोस्ट कार्यालये शनिवारपासून ३ दिवस बंद होती, तर जीपीओ रविवार व सोमवारी बंद होते. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी व स्पीड पोस्ट करण्याची सुविधा देण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकातील ट्रान्झिस्ट मेल कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या ठेवण्याचे निर्देश पोस्टाने दिले होते.जीपीओ मधील कामकाज पूर्णत: बंद असल्याने नेहमी गजबजलेल्या जीपीओमध्ये सोमवारी शुकशुकाट होता. मुंबई जीपीओ कार्यालय व दक्षिण मुंबईतील १७ सब पोस्ट कार्यालयांमध्ये कोअर सिस्टीम इंटिग्रेशन (सीएसआय) ही संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम सदर तीन दिवस करण्यात आले. आजपासून (मंगळवार) येथील सर्व कामांचे व्यवस्थापन अत्याधुनिक प्रणालीद्वारे करण्यास प्रारंभ होईल.

टॅग्स :मुंबईबातम्या