Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोवंडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 02:15 IST

फोटो व्हायरल करण्याचे धमकावून अत्याचार

मुंबई : विवस्त्रावस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, दोघांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच गोवंडीत घडला आहे. अत्याचार करणाऱ्या दोघांना ट्रॉम्बे पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. अमजदअली मोहम्मदजमा खान (वय ३०) व नूर मोहम्मद नजीर शेख (४२, दोघे रा. म्हाडा कॉलनी, गोवंडी) अशी त्यांची नावे आहेत.

खान हा पेंटर तर शेख वाहन चालकाचे काम करतो. परिसरात राहत असलेल्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून खानने तिच्याशी जवळीक निर्माण केली होती. तिचे विवस्त्रावस्थेतील फोटो त्याने मागवून घेतले होते. त्यानंतर, तो तिला ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तिला ६ सप्टेंबरला मानखुर्द, महाराष्टÑनगरातील शांती को-आॅपरेटिव्ह सोसायटीतील रूम नं. ११५ मध्ये त्याने बोलाविले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास खान व त्याचा मित्र शेखने तिच्यावर बलात्कार केला. तिने घडलेल्या प्रकाराबाबत शनिवारी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

टॅग्स :बलात्कार