Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगबाजीला गोविंदा पथकाची जोरदार दाद

By मनोहर कुंभेजकर | Updated: August 19, 2022 19:18 IST

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगबाजीला उपस्थित गोविंदा पथकाने आणि मागाठाणेच्या नागरिकांनीही जोरदार दाद दिली.

मुंबई - सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी गुवाहटी येथे संपूर्ण देशासह विदेशातही लोकप्रिय झालेला आपला, 'काय झाडी, काय डोंगर, सर्वकाही ओके,' हा डायलॉग सादर केला, त्यांच्या या डायलॉगबाजीला उपस्थित गोविंदा पथकाने आणि मागाठाणेच्या नागरिकांनीही जोरदार दाद दिली. मागाठाणे दहीकला महोत्सवात त्यांनी भेट देवून येथील गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, लोकसभेतील शिंदे गटाचे गटनेते खासदार राहुल शेवाळे, खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांना येथील दहीकला पथकाने सात थर रचून सलामी दिली. 

टॅग्स :दहीहंडीशिवसेना