Join us

गोविंदा पथकांची ‘बंडखोरी’

By admin | Updated: August 17, 2014 01:05 IST

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशांना स्थगिती दिली असली तरी, बालहक्क संरक्षण आयोगाचा निर्णय मात्र कायम ठेवला आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशांना स्थगिती दिली असली तरी, बालहक्क संरक्षण आयोगाचा निर्णय मात्र कायम ठेवला आहे. त्यामुळे या आदेशातूनही ‘छुपी’ पळवाट काढत गोविंदा पथकांनी थेट बालगोविंदानांच ‘पोपटपंची’चे धडे द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता गोविंदा पथकांची ही ‘बंडखोरी’ उत्सवाच्या दिवशी त्यांना भोवणार की यातूनही काही ‘राजकारण्यां’च्या वरदहस्तामुळे ही मंडळी सहीसलामत सुटणार हे पाहणो औत्सुक्याचे ठरेल.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झुगारून ब:याचशा गोविंदा पथकांनी 12 वर्षाखालील बालगोविंदानाही ‘एक्का’ म्हणून चढविण्यासाठी शक्कल लढवित अनेक क्लृप्या योजल्या आहेत. त्यात मुख्य म्हणजे ‘एक्का’ म्हणून चढणा:या बालगोविंदांना वय आणि इयत्तेबद्दल विचारणा झाल्यास त्यांनी आपले वय 12 वर्षाहून अधिक असून वरच्या इयत्तेत असल्याचे सांगा अशी ‘कानभरणी’ही करण्यात आली आहे.
गोविंदा पथकातील प्रत्येक खेळाडूचे नाव, पत्ता, छायाचित्र, वयाचा दाखला पोलिसांकडे देणो अत्यावश्यक असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मात्र दहीहंडी उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अजूनही गोविंदा पथकांनी या नोंदणीबाबत काहीही हालचाल केलेली नाही. 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांबद्दल अजूनही ही गोविंदा पथके ‘अनभिज्ञ’ असल्याचा आव आणत आहे. त्याचप्रमाणो काही पथकांनी दोन दिवसांत ही धावपळ कशी करायची याबद्दलही साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कडक निर्देशांच्या वतरुळातून वाट काढणा:या गोविंदा पथकांसाठी यंदा दहीहंडी हा ‘उत्सव’ नसून वार्षिक परीक्षाच असणार आहे. (प्रतिनिधी)
 
आयडियल सांस्कृतिक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सेलिब्रेटींच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीत रश्मी अनापट, जुही पटवर्धन, संयोगिता भावे, शिल्पा नवलकर, धनश्री काडकांवकर, योगिता परदेशी, सायली जाधव, भक्ती देसाई, स्नेहा देशमुख, मृण्मयी सुपाल, स्वाती लिमये, हरीश दुधाडे आणि स्वरदा ठिगळे  त्याचप्रमाणो ‘टपाल’ चित्रपटातील नंदू माधव, विणा जामकर आणि जयवंत वाडकरही उपस्थित राहणार आहेत.