Join us

गोविंदा आला आणि पाऊसच पाऊस आला-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 7, 2023 19:36 IST

फडणवीस यांनी मंचकावर श्रीफळाने हंडी फोडली.

मुंबई- आपण सर्वजण पावसाची वाट बघत होतो.आणि आज दहीहंडी फोडायला गोविंदा आला आणि पाऊसच पाऊस आला असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी मागाठाणेत काढले.विशेष म्हणजे फडणवीस यांनी मंचकावर श्रीफळाने हंडी फोडली.

आमदार  प्रकाश सुर्वे आयोजित बोरिवली पूर्व देवीपाडा येथील मैदानात आज सायंकाळी 6.45 मिनिटांनी त्यांचे आगमन झाले.यावेळी  खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड.आशिष शेलार, भाजप विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर,जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना गोविंदा पथकाने सलामी दिली. त्यांनी उकृष्ट आयोजना बद्धल आमदार प्रकाश सुर्वे यांचे कौतुक केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा साठी जरी विमा कवच दिले असले तरी त्याची गरज पडू नये.सुरक्षित हंडी फोडा आणि मनोरे उभारा,आणि प्रेमाचा काला सर्वांना द्या असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :दहीहंडीदेवेंद्र फडणवीस