Join us

म्हाडाचा हाउसिंग स्टॉक रद्द करण्याचा सरकारचा डाव

By admin | Updated: January 23, 2015 01:55 IST

नागरिकांना स्वस्त दरात घरे मिळावीत यासाठी काँग्रेस सरकारने म्हाडाच्या हाउसिंग स्टॉकची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई : नागरिकांना स्वस्त दरात घरे मिळावीत यासाठी काँग्रेस सरकारने म्हाडाच्या हाउसिंग स्टॉकची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, विद्यमान भाजपा सरकारने हा निर्णय रद्द करण्याच्या हालचाली चालविल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सामान्यांच्या हिताचा निर्णय रद्द करू पाहणाऱ्या सरकारला बांधकाम व्यावसायिकांकडून कोणता ‘स्टॉक’ मिळाला याचेही स्पष्टीकरण राज्य सरकारने द्यावे, असे सांवत म्हणाले.