Join us

सरकारने माघार घेऊ नये, मनसेचे कृषी कायद्यांना समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:06 IST

मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे. त्याचा बीमोड करायचा म्हणून संसदेत तीन ...

मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे. त्याचा बीमोड करायचा म्हणून संसदेत तीन कृषी विषयक कायदे मंजूर झाले. आता इथून सरकारने माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल. सरकारने माघार घेऊ नये, अशा शब्दांत मनसे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी कृषी कायद्यांना समर्थन दिले.

शेतीचे भले खुल्या बाजाराशी जोडले जाण्यात आहे. तीच दिशा आहे. ज्या कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे, ते कायदे त्याच दिशेने जाणारे आहेत. त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत काही सुधारणा करता येतील, तसे प्रयत्नही करायला पाहिजेत. परंतु, आज माघार घेतली तर देशातील एकूण आर्थिक सुधारणांबाबत आपण १० वर्षे मागे जाऊ, असे शिदोरे यांनी समाज माध्यमातून सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती.’ ह्या पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे कसा अन्याय होतो आहे आणि हे नियंत्रण काढले पाहिजे, असे म्हटल्याचे समजते. मी पुस्तक वाचलेले नाही पण हे खरे आहे का, असा सवालही शिदोरे यांनी उपस्थित केला.