Join us

चांदिवलीतील दुकानदारांकडून शासनाचा आदेश पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:06 IST

मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मेडिकल, किराणा, भाजीपाला, फळे वगळता अन्य ...

मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मेडिकल, किराणा, भाजीपाला, फळे वगळता अन्य दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, चांदिवलीतील दुकानदारांनी शासनाचा हा आदेश पायदळी तुडवल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या नव्या नियमावलीची अंमलबजावणी सुरू होऊन सहा दिवस उलटले. परंतु, चांदिवलीतील दुकानदारांनी अद्याप दुकाने बंद ठेवलेली नाहीत. कपड्यांचे शोरूम, चष्मा, खेळण्यांची दुकाने, फोटो स्टुडिओ अशी अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानेही राजरोसपणे सुरू आहेत. या दुकानांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा प्रकारे नियमोल्लंघन होत राहिल्यास कोरोनाची साखळी तोडायची कशी, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला.

(फोटो ओळ – शासनाच्या निर्देशानंतरही चांदिवलीतील दुकाने सलग सहाव्या दिवशी उघडी ठेवण्यात आली.)