Join us  

बैलगाडा शर्यतीसाठी सरकार आग्रही; बैलांच्या धावण्याची क्षमता तपासण्यासाठी अभ्यासगट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:44 AM

बैलांमध्ये धावण्याची क्षमता नसते आणि तो घोड्यासारखा कार्यकौशल्य दाखवू शकत नाही, असे कारण देत बैलगाडा शर्यतींवर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी आणली असताना आता राज्य शासनाने बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला आहे.

मुंबई : बैलांमध्ये धावण्याची क्षमता नसते आणि तो घोड्यासारखा कार्यकौशल्य दाखवू शकत नाही, असे कारण देत बैलगाडा शर्यतींवर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी आणली असताना आता राज्य शासनाने बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला आहे.बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी ठिकठिकाणी होत असताना उच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्या होऊ शकत नाहीत. त्यातून मार्ग काढण्यासाठी आता बैलांच्या धावण्याची क्षमता तपासण्याचा मार्ग राज्य सरकारने शोधून काढला आहे.या अभ्यासगटाचे अध्यक्ष म्हणून पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.डी.एम.चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा अभ्यासगट बैल आणि घोड्यांची शरीर रचना, धावण्याची क्षमता, ओढ काम करण्याची क्षमता, धावताना त्यांच्या शरिरात होणारे बदल आदींचा अभ्यास करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करेल.

टॅग्स :महाराष्ट्र