Join us

सोनू निगमविरुद्ध गोवंडीत आंदोलन

By admin | Updated: April 19, 2017 03:10 IST

मशीदवरील भोंग्यामुळे झोपमोड होत असल्याचे मत गायक सोनू निगम याने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले होते. त्याच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे

मुंबई : मशीदवरील भोंग्यामुळे झोपमोड होत असल्याचे मत गायक सोनू निगम याने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले होते. त्याच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे. मंगळवारी गोवंडी येथे काही रहिवाशांनी सोनू निगमविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याचा निषेध केला. सोनूच्या म्हणण्यानुसार, तो राहत असलेल्या घराजवळच मशीद आहे. पहाटे मशीदमध्ये अजान दिली जाते. हा आवाज मोठा असल्याने झोपमोड होत असल्यासंदर्भातील टिष्ट्वट सोमवारी सोनूने केले होते. त्याला काहींनी पाठिंबा दर्शवला तर काहींनी विरोध केला. गोवंडीतील शिवाजी नगर येथे काही रहिवाशांनी सोनू निगमविरोधात मंगळवारी शिवाजी नगर सिग्नल येथे आंदोलन केले. नगरसेवक सिराज शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी सोनू निगमविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. (प्रतिनिधी)