Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबाची फुले खाणार भाव

By admin | Updated: February 12, 2015 22:32 IST

प्रेरमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल हे सगळ्यांच्याच आवडीचे असल्याने ते नेहमीच भाव खाऊन जाते.

पूनम गुरव, नवी मुंबईप्रेरमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल हे सगळ्यांच्याच आवडीचे असल्याने ते नेहमीच भाव खाऊन जाते. व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारपेठेत गुलाबाचे फूल आणि गुच्छयांच्या किमती वाढल्या आहेत. नेहमी दोन रुपयाने मिळणारे गुलाबाचे फूल यावेळी मात्र १० ते १५ रुपयांवर गेले आहे, तर ७० ते ८० रुपयांपर्यंत मिळणारा गुलाबांच्या फुलांच्या गुच्छांचा दर ३०० ते ४५० रुपयांपर्यंत उंचावला आहे.व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे. गिफ्ट कितीही मोठे असले तरी त्याच्याबरोबर प्रत्येकजण गुलाबाचे फुल भेट म्हणून देतात. यानिमित्त नवी मुंबईतील सर्व बाजारपेठा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी बहरून गेल्या आहेत. आपल्या प्रिय व्यक्तींना आवडणारे गुलाबाचे फूल विकत घेताना तरुणवर्ग दिसत आहे. लाल, पिवळा, पांढरा, गुलाबी, केशरी या रंगांची गुलाबाची फुले बाजारात विक्रीसाठी आली आहेत. मात्र लाल रंगाच्या फुलांना मागणी अधिक आहे. आकाराने लहान लाल रंगाचे गुलाबाचे फूल दोन दिवसांपासून १० ते १५ रुपयांना मिळत आहे, तर मोठ्या आकाराच्या फुलांची किंमत १६ ते २५ रुपये एवढी आहे, तसेच गुलाब आणि त्याच्यासोबत इतर फुले असलेला गुच्छ ७० ते २०० रुपयांवरून थेट ४०० ते ६०० रुपयांपर्यंत पोहचला आहे.