Join us

दोन अल्पवयीन मुलींवर गोरेगावात बलात्कार

By admin | Updated: September 20, 2014 02:39 IST

गोरेगाव पश्चिम येथे एका 11 वर्षाच्या मुलीवर तिच्या ओळखीच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना उघड झाली.

मुंबई : गोरेगाव पश्चिम येथे एका 11 वर्षाच्या मुलीवर तिच्या ओळखीच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना उघड झाली. दुसरी घटना गोरेगाव पूर्व दिंडोशी परिसरात एका 15 वर्षाच्या मुलीवर वांद्रे येथील एका महाविद्यालयात टेक्निशियन म्हणून काम करणा:या तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली. 
गोरेगाव पश्चिम येथील बलात्कारप्रकरणी रामपाल रामूसिया (23) याला गुन्हा नोंदवून गुरुवारी अटक झाली. पीडित मुलगी अनाथ असून, ती आरोपीला भाऊ मानत असे. तीन वर्षाची असताना आरोपीच्या बहिणीला पीडित मुलगी गोरेगाव येथे भेटली होती. तेव्हा तिचे पालक कोण, हे तिला माहीत नव्हते. ती एकटी असल्याने त्याने तिला स्वत:कडे ठेवले. गेल्या आठ वर्षापासून पीडित मुलगी, आरोपी व त्याची बहीण गोरेगाव बेस्ट नगर येथील पदपथावर राहत होते. दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा आरोपी राहत असलेल्या शेडच्या झोपडीत घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगू नको, अशी धमकी दिली. दुस:या दिवशी त्या मुलीने घडलेला प्रकार टेलीफोन बूथवरील महिलेस सांगितला. त्या महिलेने मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली होती. गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. या घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. गोरेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी विशेष सत्र न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली. 
दुस:या घटनेत अपहरण केलेल्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर पोलिसांच्या भीतीने पीडित मुलीला आरोपीने घरी सोडले. मात्र घडलेला प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली. या प्रकरणी नवीन धोत्रे (33) याला काल दिंडोशी पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी 15 वर्षाची असून गोरेगाव परिसरात आईवडिलांसोबत राहते. ती बांगडय़ा बनविण्याच्या कारखान्यात कामाला आहे. 16 सप्टेंबरला घरी जात असताना आरोपीने तिला एका शाळेच्या आवारात नेले. तिला तिथेच कोंडून ठेवून बलात्कार केला होता. (प्रतिनिधी)