Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘गुगल’ची शोधप्रक्रिया

By admin | Updated: June 17, 2016 02:26 IST

भारतीय चित्रपट, कलाकार, संगीत, संवादांचा शोध घेण्यासाठी व जाणून घेण्यासाठी ‘गुगल’ने सिनेरसिकांसाठी एक खास शोधप्रक्रिया सुरू केली आहे. वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात याशोधप्रक्रियेची

मुंबई : भारतीय चित्रपट, कलाकार, संगीत, संवादांचा शोध घेण्यासाठी व जाणून घेण्यासाठी ‘गुगल’ने सिनेरसिकांसाठी एक खास शोधप्रक्रिया सुरू केली आहे. वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात याशोधप्रक्रियेची औपचारिक घोषणा करण्यात आली. या वेळी दिग्दर्शक करण जोहर, गुगल इंडियाच्या विपणन विभागाच्या प्रमुख सपना चढ्ढा आणि सर्च उत्पादन व्यवस्थापक सत्यजीत सल्गार उपस्थित होते. ‘गुगल’वर देशभरातून जी माहिती सर्च करण्यात येते; त्या १० पैकी १ सर्च हा भारतीय चित्रपटांशी संबंधित असतो. भारतीयांच्या चित्रपट आवडीमुळे ‘गुगल’ला भारतीय चित्रपटांसाठी हटके शोधप्रक्रिया तयार करण्याची प्रेरणा मिळाली.