Join us

गुडबाय 2017 (आरोग्य) :  वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मकतेची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 04:07 IST

वर्षभरात आरोग्यसेवा आणि वैद्यकीय क्षेत्राने अनेक चढ-उतार पाहिले. मात्र त्यात सामान्यांना आरोग्यसेवा परवडणा-या दरात मिळावी त्याचप्रमाणे अधिकाधिक नव्या योजना आणि लाभ मिळावेत यासाठी शासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे.

वर्षभरात आरोग्यसेवा आणि वैद्यकीय क्षेत्राने अनेक चढ-उतार पाहिले. मात्र त्यात सामान्यांना आरोग्यसेवा परवडणाºया दरात मिळावी त्याचप्रमाणे अधिकाधिक नव्या योजना आणि लाभ मिळावेत यासाठी शासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे. नव्या वर्षात पालिकेतर्फे दोन रुग्णालये सेवेत येणार आहेत. तर राज्य शासनाने इमान अहमदच्या प्रकरणावरून मेडिकल टुरिझमची नवी यंत्रणा कार्यरत करण्याचे योजिले असून त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. शिवाय, वैद्यकीय आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा असणारा कट प्रॅक्टिसविरोधी कायदाही नव्या वर्षात भेटीस येईल. परिणामी यामुळे वैद्यकीय क्षेत्राला लागलेली कमिशनची कीड नष्ट होण्यास नक्कीच मदत होईल.सामान्यांसाठी बाइक अ‍ॅम्ब्युलन्सगरजू रुग्णांना तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी २ आॅगस्टपासून मुंबईत बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या बाइक अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून चार महिन्यांत तब्बल ८२३ रुग्णांना त्वरित सुविधा पुरवण्यात आली आहे. १०८ या क्रमांकाद्वारे निशुल्कपणे ही सुविधा पुरवण्यात येते.जगातील सर्वांत लठ्ठ महिलेवर शस्त्रक्रियाजगातील सर्वांत वजनदार महिला म्हणून ओळखल्या जाणाºया इमान अहमदचे २५ सप्टेंबर २०१७ रोजी अबुधाबी येथील बुर्जिल रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. काही महिन्यांपूर्वी तिच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानिमित्ताने ती साडेचार महिने या रुग्णालयात होती. इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे राहणारी इमान अहमद ही ५०० किलो वजन असलेली जगातील लठ्ठ महिला ११ फेब्रुवारी रोजी इजिप्तहून मुंबईच्या सैफी रुग्णालयात दाखल झाली होती. बॅरियाट्रिक सर्जरीच्या माध्यमातून इमानचे वजन कमी करण्याचे आव्हान डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी स्वीकारले व त्यांच्या प्रयत्नांना यश आले.निवासी डॉक्टरांचा संपराज्यभरातील रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी प्रलंबित मागण्या, रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणारी मारहाण आणि अपुºया सुरक्षा व्यवस्थेच्या कारणामुळे संप पुकारला होता. ४-५ दिवस केलेल्या या संपात रुग्णसेवेवरही परिणाम झाला. डॉक्टरांच्या संपाविषयी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय, न्यायालयीन प्रक्रिया आणि राज्यकर्त्यांना साकडे घातल्यानंतर काही मागण्यांची पूर्तता केल्यानंतर या संपकर्त्यांनी माघार घेतली अन् हळूहळू रुग्णसेवा पूर्ववत झाली.स्टेंटचे दर घटलेहृदयविकाराच्या रुग्णांसाठी अँजिओप्लास्टी करण्याकरिता वापरण्यात येणारे स्टेंटचे दर गगनाला भिडले होते. या सर्वांत लूटमारीचा प्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. नुकतेच राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने देशभरातील सर्व रुग्णालयांना स्टेंटविषयी विशेष निर्देश दिले आहेत. त्यात रुग्णालयाने स्टेंटचे प्रकार, ब्रँड, उत्पादक, किंमत याची माहिती रुग्णालय आवारात लावावी; तसेच रुग्णालयाच्या बिलात स्टेंटच्या प्रकाराचा, किमतीचा स्पष्ट उल्लेख असावा, असे निर्देश दिले आहेत.स्वाइनचे ७७४ बळीयंदाच्या वर्षात स्वाइन फ्ल्यूने एकूण ७७४ बळी घेतले असून ६,१३४ रुग्ण आढळले आहेत. नाशिक, नागपूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण भागात या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. दररोज ६ हजार ११५ रुग्णांची तपासणी करण्यात येत असून आतापर्यंत राज्यात २१ लाख ११ हजार ७३० रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.अखेर आराध्याला हृदय मिळाले : दीड वर्षापासून आराध्याचे वडील दिवसरात्र एक करून तिच्यासाठी हृदयदात्याच्या शोधात होते. अखेर ५ सप्टेंबर रोजी तिला हृदयदाता मिळाला. आराध्याला एप्रिल २०१६ला अचानक त्रास होऊ लागला होता. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत आराध्याचं हृदय फक्त १0 टक्के काम करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिच्यावर हृदय प्रत्यारोपण हा एकच पर्याय होता. आराध्याला हवे असलेले हृदय सुरतच्या एका रुग्णालयात मिळाले.लवकरच मेडिकल टुरिझम : राज्यात अनेक पंचतारांकित रुग्णालयांत परदेशातून सुमारे ५० हजार विदेशी रुग्ण दरवर्षी उपचारासाठी दाखल होतात. मेडिकल टुरिझम हे सर्व विदेशी रुग्णांना सहज, सोपे व किफायतशीर होण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात त्यांनी मंत्रालयात मुंबईतील विविध रुग्णालयांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. आरोग्यमंत्र्यांनी प्रमुख रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व वैद्यकीय संचालक यांच्याकडून सूचना मागवल्या व एसओपी तयार करण्याचे काम सुरू आहे. या एसओपीत मेडिकल व्हिजा ते आॅप्लिकेशन रिमार्क्स अभिप्रायापर्यंत सर्व बाबींचा समावेश करण्यात येत आहे.‘कट प्रॅक्टिस’ चर्चेत : मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. रमाकांत पांडा यांनी लावलेल्या होर्डिंगच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील कळीचा मुद्दा असणाºया कट प्रॅक्टिसने पुन्हा डोके वर काढले आहे. महाडचे डॉ. हिंमतराव बावीस्कर कट प्रॅक्टिसविरोधात कायदा करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत. अखेर राज्य सरकारने कट प्रॅक्टिसविरोधात कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना केली. या समितीच्या दोन बैठका झाल्या असून यात कायदासल्लागार व तज्ज्ञ डॉक्टरांची चमू आहे.गरीब रुग्णांसाठी पुढाकारशहरातील पंचतारांकित रुग्णालयात थेट धर्मादाय आयुक्तांनी स्टिंग आॅपरेशन करून गरीब रुग्णांना आरोग्यसेवेचा हक्क मिळवून दिला. धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर शहर-उपनगरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी झोपडपट्टी, रस्त्यावरील गरीब रुग्णांना उपचार देण्याचे मान्य केले. गोरगरीब तसेच आर्थिक पातळीवर समाजाच्या सर्वांत खालच्या स्तरावर असणाºया नागरिकालादेखील सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा मिळावी, आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्याने कुणाच्याही उपचारात खंड पडू नये यासाठी धमार्दाय आयुक्तालयाच्या पुढाकारातून ‘धमार्दाय रुग्णालय गरीब रुग्णांच्या दारी’ हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत मुंबई, ठाणे जिल्ह्यातील झोपडपट्टी, पादचारी मार्गावरील ११ हजार रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.जेनेरिक औषधांचा वापरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रँडेड औषधांऐवजी जेनेरिक औषधांना प्राधान्य द्यावे अशी घोषणा केली होती. तेव्हापासून राज्यस्तरावरही जेनेरिक औषधांचा वापर व्हावा यासाठी जनजागृती करण्यात आली. त्याप्रमाणे, शासकीय यंत्रणांनीही जेनेरिकच्या वापरासाठी पुढाकार घेतला. देशातील कंपन्या ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधे निर्यात करतात. देशात मात्र ब्रॅण्डेड नावाने अधिक किमतीत ही औषधे विकली जातात.

टॅग्स :आरोग्य