Join us

फिल्म डिव्हिजनच्या माहितीपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:19 IST

महोत्सवात 'लिव्हिंग द नॅचरल वे' आणि 'वॅनिशिंग ग्लेशिअर' माहितीपटांचं स्क्रीनिंग दाखवण्यात आले

मुंबई – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून फिल्म डिव्हिजनने 5 जून रोजी आयोजित केलेल्या एकदिवसीय ऑनलाइन महोत्सवाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या महोत्सवामध्ये संस्थेच्यावतीने 'लिव्हिंग द नॅचरल वे' आणि 'वॅनिशिंग ग्लेशिअर'  हे दोन माहितीपट दाखवण्यात आले होते. फिल्म डिव्हिजनच्या संकेतस्थळावर आणि अधिकृत यू ट्यूब चॅनेलवर 5 जून 2020 रोजी या माहितीपटांचे ऑनलाइन प्रसारण केले गेले. माध्यम म्हणून चित्रपट, व्यापक कक्षेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो आणि सामान्य लोकांमध्ये किंवा दर्शकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. देशभरात सगळीकडे साथीच्या आजाराशी लढा सुरू असताना सिनेमागृह आणि चित्रपटगृह बंद असले, तरीही नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणारे फिल्म डिव्हीजन, माहितीपटांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.'लिव्हिंग द नॅचरल वे' (78 मि./  दिग्दर्शक- संजीव पराशर) हा माहितीपट  ब्रह्मपुत्रेच्या एका छोट्या बेटावर राहणाऱ्या मिशिंग जमातीमधील यादव पेयांग याची तसेच बदलत्या हवामानामुऴे या जमातीला त्यांच्या पारंपरिक राहणीमान कायम ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेची कहाणी आहे. 'व्हॅनिशिंग ग्लेशिअर' (52 मि. / दिग्दशर्क- राजा शबीर खान) हा माहितीपट  जागतिक तापमानवाढीमुळे अकाली वितळणाऱ्या हिमनगाबाबतची चिंता आणि भविष्यातील संभाव्य परिणामांबाबचे भाष्य करतो.