Join us  

खूशखबर...येत्या 16 डिसेंबरपासून एनईएफटी 24 तास; कधीही पैसे पाठवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 3:34 PM

आरबीआयने शुक्रवारी बँकांना यासाठी आवश्यक तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्याच्या नियमानुसार एनईएफटी सुविधा सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असते.

मुंबई : नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी ) द्वारे 24 तास पैसे पाठवता येणार आहेत. ही सुविधा येत्या 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. महत्वाचे म्हणजे ही सेवा सुट्टीच्या दिवशीही मिळणार आहे. 

आरबीआयने शुक्रवारी बँकांना यासाठी आवश्यक तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्याच्या नियमानुसार एनईएफटी सुविधा सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असते. तात्काळ पैसे ट्रान्सफर करायचे असल्यास भीम युपीआयवर अवलंबून रहावे लागते. तसेच महिन्याच्या तिसऱ्या आणि पहिल्या शनिवारी एनईएफटीचा वेळ सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असतो. डिजिटल ट्रान्झेक्शनला वाढ मिळण्यासाठी आरबीआयने ऑग्सटमध्येच याची घोषणा केली होती. मात्र, तारिख सांगतिली नव्हती. 

आरबीआयने 1 जुलैपासून एनईएफटी आणि रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) वर बँकांनी शुल्क घेणे बंद करण्यास सांगितले आहे. तसेच बँक ग्राहकांना याचा फायदा देण्याचेही सांगितले होते. यामुळे एसबीआयने आरटीजीएसने एनईएफटीवर 1 ऑगस्ट शुल्क घेणे बंद केले होते. 

मात्र, एनईएफटीमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मर्यादा आहेत. याद्वारे 2 लाखांपेक्षा जास्त पैसे पाठविता येणार नाहीत. यासाठी आरटीजीएस वापरावे लागणार आहे.

टॅग्स :एसबीआयभारतीय रिझर्व्ह बँकबँक